मिडाझोलांम हे औषध कसे वापरावे

Midazolam हे औषध फिट थांबवण्यासाठी वापरतात. हे औषध फिटचा कालावधी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

हे औषध स्प्रे च्या स्वरूपात उपलब्ध असून, ते नाकाच्या दोन्ही नाकपुडीतून द्यावे लागते. हे औषध वापरताना घ्याव्या लागणाऱ्या काळजी खालिल प्रमाणे आहे.

To understand what is seizure read our previous blog

फिट म्हणजे काय हे समजण्यासाठी आमचा पूर्वीचा लेख खालील लिंक वर वाचा

– https://epilepsyhelpindia.blogspot.com/2020/03/epilepsy-yes-its-curable.html

फिट आलेल्या रुग्णांची प्राथमिक मदत कशी करावी यासाठी हे वाचा

– https://epilepsyhelpindia.blogspot.com/2022/01/seizure-first-aid.html

*Midazolam हे औषध कसे वापरावे?*

१. प्राथमिक मदत सुरू करा ( वरील लेखात नमूद केल्याप्रमाणे)

२. तुमच्या डॉक्टरांचं मिडाझोलामचे प्रिस्क्रीपशन बघा

३. फिटच वेळ नोंद करा

4. If the seizure lasts more than the specified time e.g 5 minutes then use the spray.

४. जर फिट ३-५ मिनिटांच्या वर राहिली तर स्प्रेचा वापर करा

५. रुग्णाला मानेला आधार देऊन डोकं थोड वर करा

६. प्रथम २-३ वेळा हा स्प्रे हवेत उडवावा जेणे करून आत अडकलेली हवा बाहेर येईल

७. हळूवार स्प्रेच टोक नाकपुडीत ठेऊन डॉक्टरांनी सांगितलेला डोस सोडावा.

८. दोन्ही नाकपुडीतून एकसारखा डोस सोडावा

९. जर एकदा स्प्रे करून फिट चालू राहिल्यास ५-१० मिनिटात डॉक्टरांनी सांगितलं असेल तर डोस पुन्हा देऊ शकतो.

१०. स्प्रे केल्यावर रुग्ण झोपी जाउ शकतो.

११. जास्तीत जास्त हा स्प्रे दिवसातून दोन वेळाच वापरू शकतो.

१२. स्प्रे वापरून सुद्धा जर फिट चालू राहिल्यास त्वरित जवळच्या हॉस्पिटलच्या तातडीक विभागात घेऊन जाणे.

डॉ संदीप पाटील

फिटतज्ञ आणि लहान मुलांचे मेंदुरोग तज्ञ

पुणे, भारत
भ्रमण ध्वनी – 9421351587
email – apexneurocarepune@gmail.com